निष्क्रिय फ्लडलाईटचे स्टील खांब धोकादायक

निष्क्रिय फ्लडलाईटचे स्टील खांब धोकादायक

Published on

निष्क्रिय फ्लडलाइटचे खांब धोकादायक
तारापूर औद्योगिक क्षेत्रात अपघाताचा धोका

तारापूर, ता. २२ (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक क्षेत्रात काही वर्षांपूर्वी रस्त्यालगत उभारण्यात आलेले फ्लडलाइटचे स्टील खांब सध्या निष्क्रिय व जीर्ण अवस्थेत उभे असून, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी हे खांब वीजवाहिन्यांशिवाय तसेच ठेवण्यात आले असून, काही खांब कलंडलेले, तर काही तुटलेल्या अवस्थेत आढळून येत आहेत.
सध्या औद्योगिक क्षेत्रात गटार व रस्ते दुरुस्तीची कामे सुरू असल्याने विविध ठिकाणी खोदकाम करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्यालगत उभे असलेले निष्क्रिय खांब हे कामगार, वाहनचालक आणि कारखान्यांमध्ये ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. काही ठिकाणी खांब थेट रस्त्यावर झुकलेले किंवा पडलेले दिसत असून, कोणतीही संरक्षणात्मक उपाययोजना करण्यात आलेली नाही.
याच परिसरात ९ ऑगस्ट २०२२ रोजी घडलेल्या दुर्घटनेत कामावर जात असताना विजेचा खांब अंगावर पडून योगेश पागधरे (वय ३५) यांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतरही धोकादायक खांब हटविणे किंवा सुरक्षित करण्याबाबत ठोस पावले उचलली गेली नसल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक, कामगार व नागरिकांनी संबंधित प्रशासनाने तातडीने पाहणी करून निष्क्रिय व जीर्ण खांब काढून टाकावेत किंवा त्यांची दुरुस्ती करून परिसर सुरक्षित करावा, अशी मागणी केली आहे अन्यथा कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com