दुकानासमोरील जिवंत झाड जाळल्याचा प्रकार

दुकानासमोरील जिवंत झाड जाळल्याचा प्रकार

Published on

दुकानासमोरील जिवंत झाड जाळल्याचा प्रकार; पर्यावरणप्रेमींकडून संताप व्यक्त

बोईसर, ता. २१ (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक क्षेत्रालगत कोलवडे ग्रामपंचायत हद्दीत पर्यावरणाला धक्का देणारी घटना उघडकीस आली आहे. टाटा स्टील कंपनीच्या परिसरालगत उभारण्यात आलेल्या काही गाळ्यांपैकी एका दुकानासमोरील जिवंत झाड जाणीवपूर्वक जाळल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दुकानासमोर उभे असलेले झाड वाहनांच्या ये-जा करण्यास अडथळा ठरत असल्याचे कारण देत झाडाच्या मुळाशी कचरा साचवून त्यास आग लावण्यात आली. या आगीत झाड काही प्रमाणात जळाले असून, परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पर्यावरण संरक्षणाबाबत शासन व सामाजिक संस्थांकडून जनजागृती मोहिमा राबविल्या जात असताना अशा प्रकारे जिवंत झाडे नष्ट केली जात असल्याचे चित्र चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमींनी दिली. झाडे ही पर्यावरण संतुलनासाठी अत्यावश्यक असून, त्यांची जाणीवपूर्वक तोड किंवा नासधूस करणे कायद्याने दंडनीय आहे.
या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी ग्रामपंचायत व प्रशासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पर्यावरण संवर्धन ही सामूहिक जबाबदारी असून, किरकोळ सोयीसाठी हरित संपदा नष्ट करण्याचे प्रकार थांबले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

०००००००००००००००००
कोट

जिवंत झाड जाळणे, हा केवळ कायद्याचा भंग नाही तर निसर्गाशी केलेला विश्वासघात आहे. एका झाडासाठी अनेक वर्षे लागतात, पण ते नष्ट करण्यासाठी काही मिनिटे पुरेशी ठरतात. अशा प्रकारांवर तत्काळ आणि कठोर कारवाई झाली पाहिजे. पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
- कौशल जाधव, पर्यावरणप्रेमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com