कोसबाड हिल येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन

कोसबाड हिल येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन

Published on

शेतकरी मेळाव्याला तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

वाणगाव (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शाश्वत शेती पद्धतींचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल यांच्या वतीने शुक्रवारी (ता. २०) युवा शेतकऱ्यासाठी आणि शनिवारी (ता. २१) शेतकरीवर्गासाठी कृषी वानिकीविषयक प्रशिक्षण आणि शेतकरी मेळावा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शेतीसोबत वृक्षलागवड करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, पर्यावरण संवर्धन करणे, तसेच हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर टिकाऊ शेतीप्रणाली विकसित करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कृषी वानिकीचे महत्त्व, वनरोपवाटिका, पीक संरक्षण, युवकांसाठी रोजगारक्षम उपक्रम तसेच वृक्षआधारित शेतीतून आर्थिक लाभ कसा मिळवावा, याबाबत तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी शेतकऱ्यांना कृषी वानिकी योजनांबाबत माहिती देण्यात आली व शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा, याबाबतही मार्गदर्शन केले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com