शैलेंद्र शाळेत शिवदुर्ग व शिवकालीन शस्त्रास्त्र-नाणींचे भव्य प्रदर्शन

शैलेंद्र शाळेत शिवदुर्ग व शिवकालीन शस्त्रास्त्र-नाणींचे भव्य प्रदर्शन

Published on

शैलेंद्र शाळेत शिवदुर्ग व शिवकालीन शस्त्रास्त्रे-नाणींचे भव्य प्रदर्शन
मालाड, ता. २१ (बातमीदार) : शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त गुरुवार (ता. १९) ते रविवार (ता. २२)दरम्यान संस्थेच्या मैदानात व सभागृहात शिवदुर्गांच्या प्रतिकृती तसेच शिवकालीन शस्त्रास्त्रे व नाणी यांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात युनेस्‍कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केलेल्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती सादर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये विशेषतः रायगड, राजगड, प्रतापगड, सिंहगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, तोरणा आणि सुवर्णदुर्ग यांचा समावेश आहे. याशिवाय शिवकालीन शस्त्रास्त्रे, नाणी आणि इतर ऐतिहासिक वस्तूंचेही आकर्षक प्रदर्शन मांडण्यात आले असून इतिहासप्रेमी, विद्यार्थी आणि शिवभक्तांसाठी ही एक अनोखी पर्वणी ठरणार आहे.
हे प्रदर्शन सर्वांसाठी निःशुल्क खुले असून शिवप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष ग. स. पांडलोसकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com