साईसागर रेस्टॉरंटवर चोरट्यांचा डल्ला
अंबरनाथ, ता. २१ (वार्ताहर) : शहरातील लादीनाका परिसरातील साईसागर रेस्टॉरंट आणि परमिट रूम बारमध्ये चोरट्याने डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी हॉटेल व्यावसायिक राजस पिसाळ यांनी अंबरनाथ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
ही घटना १९ फेब्रुवारीला रात्री १२.३० ते २० फेब्रुवारी सकाळी १० च्या दरम्यान घडली. चोरट्याने हॉटेलच्या मागील बाजूला असलेल्या किचनच्या दरवाजातून प्रवेश केला. त्यानंतर बारमधील लाकडी काउंटरच्या ड्रॉव्हरचे लॉक तोडून त्यातील ६० हजार रुपयांची रोकड आणि एक मोबाईल असा एकूण ६१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. अंबरनाथ पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

