शिवजयंतीनिमित्त दहिवली गावात मोफत आरोग्य शिबिर; आदर्श सामाजिक उपक्रम

शिवजयंतीनिमित्त दहिवली गावात मोफत आरोग्य शिबिर; आदर्श सामाजिक उपक्रम

Published on

दहिवली गावात मोफत आरोग्य शिबिर
कर्जत, ता. २१ (बातमीदार) ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दहिवली गावात मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. श्री समर्थ क्लिनिकचे डॉ. मेघश्याम हिवाळे व दहिवली गाव परिसर विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरामध्ये नागरिकांसाठी विविध वैद्यकीय तपासण्या मोफत करण्यात आल्या. त्यामध्ये मधुमेह, थायरॉइड तपासणी, युरिक ॲसिड तपासणी यांचा समावेश होता. शिबिरात सुमारे १४० रुग्णांची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला व उपचार देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com