सावरोली खारपाडा मार्गावर धोकादायक वळणावर मोरीच काम
सावरोली-खारपाडा मार्ग धोकादायक
वळणावर मोरीच काम ः अपघात टाळण्यासाठी गतिरोधकाची मागणी
खालापूर, ता. २१ (बातमीदार) ः सावरोली-खारपाडा राज्य मार्गावर खरसुंडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत पावसाळी मोरीचे बांधकाम सुरू आहे. मात्र, या ठिकाणी करण्यात आलेला पर्यायी मार्ग अत्यंत धोकादायक असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी काम सुरू असलेल्या ठिकाणी दोन्ही बाजूंना तातडीने गतिरोधक बसवण्याची मागणी दिलासा फाउंडेशन रस्ता सुरक्षा अभियान सदस्यांनी केली आहे.
सावरोली-खारपाडा हा मार्ग पाताळगंगा औद्योगिक वसाहत आणि ढेकू लघुउद्योग नगरीला जोडणारा प्रमुख दुवा आहे. पेण, पनवेल, पाली आणि खालापूर या चार तालुक्यांना जोडणारा हा मुख्य रस्ता असल्याने येथून अवजड वाहने आणि प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. रस्ता एकेरी असून अनेक ठिकाणी साईड पट्ट्यांचा अभाव असल्याने हा मार्ग आधीच धोकादायक आहे.
सध्या माजगाव आणि कुंभिवली हद्दीतल या मार्गावर पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या मोरीची उंची वाढवण्याचे काम सुरू आहे. जुनी मोरी काढून त्या ठिकाणी नवीन बांधकाम करण्यात येत आहे. त्यासाठी मुख्य रस्ता बंद करून पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. सध्या खरसुंडी हद्दीत सेंट मेरी शाळेच्या पुढे अवघड वळणावर हे काम सुरू आहे. त्यातच तयार करण्यात आलेला कच्चा पर्यायी रस्ता अधिकच वळणदार झाला असून अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे याठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी करण्यात येत आहे. दोन्ही बाजूला गतिरोधक बसवल्यास वाहनांचा वेग कमी होऊन संभाव्य दुर्घटना टाळता येणार आहेत, असे दिलासा फाउंडेशन रस्ता सुरक्षा अभियान सदस्यांनी केली आहे.
दरम्यान, काम सुरू असलेल्या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना आणि आवश्यक असल्यास गतिरोधक बसवण्यासाठी कंत्राटदाराला सूचना करण्यात येतील, असे खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी सांगितले.
**फोटो-काम सुरू असलेल्या ठिकाणी असलेल धोकादायक वळणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

