महासभेच्या पहिल्याच दिवशी पालिकेत राजकीय राडा

महासभेच्या पहिल्याच दिवशी पालिकेत राजकीय राडा

Published on

वसई-विरार महापालिकेची पहिलीच महासभा वादळी
भाजप-बविआ आमनेसामने; गटनेत्याच्या कार्यालयावरून भाजपचा ठिय्या

विरार, ता. २१ (बातमीदार) : वसई-विरार शहर महापालिकेच्या निवडणुकीनंतर पार पडलेली पहिलीच महासभा राजकीय राड्याने गाजली. सत्ताधारी बहुजन विकास आघाडी (बविआ) आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यातील वाद पहिल्याच दिवशी उफाळून आल्याने पालिका मुख्यालयात मोठा तणाव निर्माण झाला होता. गटनेत्याला कार्यालय देण्यावरून सुरू झालेला हा वाद आगामी पाच वर्षांतील राजकीय संघर्षाची नांदी असल्याचे मानले जात आहे.

महासभा सुरू होण्यापूर्वीच भाजप नगरसेवक आक्रमक झाले होते. महापालिकेत भाजप गटनेत्याला अद्याप अधिकृत कार्यालय उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. या मुद्द्यावर संताप व्यक्त करत भाजप नगरसेवकांनी थेट आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या दालनात शिरकाव केला आणि जोरदार घोषणाबाजी केली. ‘गटनेत्याला कार्यालय देणे हा लोकशाही प्रक्रियेचा भाग असून प्रशासनाने जाणीवपूर्वक दिरंगाई करू नये, असा इशारा भाजप गटनेते अशोक शेलके यांनी या वेळी दिला. या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. महासभा सुरू झाल्यावर आंदोलक नगरसेवकांनी सभागृहात प्रवेश केला; मात्र वातावरणातील तणाव कायम होता. महासभेचे वृत्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांनाही या गोंधळाचा फटका बसला. पत्रकार कक्षात राजकीय कार्यकर्त्यांनी गर्दी केल्यामुळे पत्रकारांना बसण्यासाठी जागा उरली नाही. कार्यकर्त्यांच्या घुसखोरीमुळे पत्रकारांना मागील बाकांवर बसून कामकाज पाहावे लागले.

राजकीय जुगलबंदीचे संकेत
नवनिर्वाचित सभागृहाच्या पहिल्याच दिवशी ज्या प्रकारे सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले, त्यावरून पालिकेतील आगामी कार्यकाळ वादळी ठरणार हे स्पष्ट झाले आहे. बविआच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी भाजपने पहिल्याच दिवशी आक्रमक पवित्रा घेतल्याने शहराच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com