शिवसेनेच्या वतीने विद्यार्थांना मोफत लॅपटॉपचे वितरण
शिवसेनेच्या वतीने विद्यार्थांना मोफत लॅपटॉपचे वितरण
घाटकोपर, ता. १९ (बातमीदार) ः शिवसेनेच्या नगरसेविका सकीना शेख आणि इमरान शेख यांच्या पुढाकारातून महानगरपालिका शाळा क्रमांक तीन येथे विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप भेट देत एक आदर्श आणि स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण, ऑनलाइन अभ्यास, प्रेझेंटेशन तयार करणे आणि विविध शैक्षणिक उपक्रम अधिक प्रभावीपणे आणि आत्मविश्वासाने पार पाडता येणार आहेत.
आजच्या डिजिटल युगात शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होणे आणि त्याचा प्रभावी वापर करता येणे ही काळाची गरज बनली आहे. ही गरज ओळखून नगरसेविका सकीना शेख आणि इमरान शेख यांनी शाळेला लॅपटॉप प्रदान केला. डिजिटल साधनांची उपलब्धता वाढल्याने विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसोबतच त्यांची स्पर्धात्मक तयारीही अधिक सक्षम होणार आहे. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले. समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची गरज असून भविष्यातही अशाच प्रकारे शैक्षणिक मदत सुरू ठेवण्याचा संकल्प असल्याचे युवासेनेचे इम्रान शेख यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

