मालवणीत शिवजयंती उत्साहात साजरी..
मालवणीत शिवजयंती उत्साहात साजरी
मालाड, ता. २१ (बातमीदार) : मालवणीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्साहात साजरी झाली. राष्ट्र सेवा दल आणि सफल विकास वेल्फेयर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांसह पालकांनी शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेल्या पराक्रमांची आणि आदर्श कारभाराची आठवण यावेळी करण्यात आली.
विद्यार्थिनी अंकिता कनोजिया हिने उपस्थितांना छत्रपतींविषयी सविस्तर माहिती दिली. ‘रयतेचा राजा’ म्हणून त्यांना का ओळखले जाते, याचेही तिने सुंदर शब्दांत विवेचन केले. सर्व धर्मियांना समान वागणूक देणारे आणि महिलांचा विशेष सन्मान करणारे शासक म्हणून महाराजांचे कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे तिने सांगितले. कार्यक्रमात देशभक्तीपर घोषणांनी आणि शिवगर्जनेने परिसर दुमदुमून गेला. उपस्थितांनी शिवरायांच्या विचारांचे अनुकरण करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

