छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव व वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
शिवरायांचे शौर्य डोळ्यासमोर ठेवून काम करा ः अरविंद सावंत
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव व वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
शिवडी, ता. २१ (बातमीदार) : सहकारी भांडार प्रगतिपथावर न्यायचे असेल तर शिवरायांचे शौर्य आणि ध्येय डोळ्यासमोर ठेवून सर्वांना काम करावे लागेल, असे भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष व ठाकरे शिवसेनेचे उपनेते, खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. सहकारी भांडारच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व वार्षिक स्नेहसंमेलन महात्मा गांधी सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी सहकारी भंडारचे अध्यक्ष संजय शेटे होते.
ठाकरे सेनेचे उपनेते व भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस आमदार सचिन अहिर म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज यांनी ४०० वर्षांपूर्वी संघर्ष, न्याय आणि समतेचा आदर्श निर्माण केला. तोच आदर्श सहकारी चळवळीला अस्तित्वाच्या काळात तारून नेईल, असा विश्वासही अहिर यांनी येथे व्यक्त केला. सहकारी भांडारचे अध्यक्ष संजय शेटे आपल्या भाषणात म्हणाले, की स्थित्यंतरे, संकटे अनेक येतील, पण काळाची पावले ओळखून पुढे जावे लागेल.
उपाध्यक्ष प्रवीण लगड म्हणाले, की आज ऑनलाइन प्रभावाचा परिणाम सहकारी भांडारावर होऊ लागला आहे याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. सहकारी भांडारच्या सरचिटणीस माधुरी सावंत यांनी आपल्या भाषणात सेवकांच्या निष्ठापूर्वक कामाचा उल्लेख करून नवीन पगारवाढीच्या आवश्यकतेकडे मान्यवरांचे लक्ष वेधले. वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने निवृत्त कामगार, पंचवीस वर्षांचा सेवाकाळ बजावलेल्या कामगारांचा आणि क्रीडा स्पर्धकांचा पुरस्काराने, तर गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिकाने सन्मान करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

