पुणे विद्यार्थी गृह विद्या भवन शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी

पुणे विद्यार्थी गृह विद्या भवन शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी

Published on

चिमुकल्यांनी रंगमंचावर साकारला शिवरायांचा इतिहास
पुणे विद्यार्थी गृह विद्या भवनात शिवजयंती उत्साहात
घाटकोपर, ता. २१ (बातमीदार) ः येथील विद्या भवन प्राथमिक इंग्रजी शाळेत शिवजयंती दिमाखात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात चौथीच्या एकूण २१५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध ऐतिहासिक प्रसंगांचे जिवंत नाट्यरूपांतर रंगमंचावर सादर केले.
अफजलखान वध, आग्र्याहून सुटका, स्वराज्य स्थापनेचा संकल्प आणि राज्याभिषेक सोहळा यांसारखे प्रसंग प्रभावी संवाद व नेटक्या अभिनयातून साकारण्यात आले. तसेच चौथीतील विद्यार्थिनींनी सादर केलेली नृत्याविष्कार मनात ठसा उमटवणारी ठरली. हा संपूर्ण कार्यक्रम स्नेहा राणे, रेश्मा पालकर आणि दीपक निचित यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून शौर्य, स्वाभिमान, संघटनशक्ती आणि राष्ट्रप्रेम या मूल्यांची प्रभावी जाणीव झाली. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापिका अनघा सावंत यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले. आपल्या मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वातील किमान एक तरी गुण आपल्या जीवनात आत्मसात करावा. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com