कर्जत नगरपरिषदेत स्थायी व विषय समित्यांची स्थापना
कर्जत नगर परिषदेत स्थायी व विषय समित्यांची स्थापना; विरोधकांचा सभात्याग
स्थायी समिती सदस्यसंख्येवरून मतदान; बहुमताने पाच सदस्यांचा निर्णय
कर्जत, ता. २१ (बातमीदार) : कर्जत नगर परिषदेच्या विशेष सभेत स्थायी समिती व विविध विषय समित्यांची स्थापना करण्यात आली. मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. सभेत सर्व २१ नगरसेवक उपस्थित होते. स्थायी समितीतील सदस्यसंख्या ठरविताना आघाडी व विरोधकांमध्ये मतभेद झाल्याने मतदान घेण्यात आले. आघाडीच्या पाच सदस्यांच्या प्रस्तावाला १३ मते मिळाली, तर सात सदस्यांच्या प्रस्तावाला आठ मते मिळाली. बहुमताच्या आधारे पाच सदस्यांची स्थायी समिती निश्चित करण्यात आली. या निर्णयावर नाराजी व्यक्त करीत विरोधी गटनेते संकेत भासे यांच्यासह नऊ जणांनी सभात्याग केला.
यानंतर विषय समित्यांच्या सभापतींची निवड करण्यात आली. स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतिपदी संतोष पाटील (पदसिद्ध), पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी सुचिता देवेंद्र खोत, वीज व सार्वजनिक बांधकाम तसेच शहर नियोजन व विकास समितीच्या सभापतिपदी महेंद्र बबन चंदन, तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी हर्षाली उमेश गायकवाड यांची निवड झाली. महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापतिपदी अंजली अतुल कडू यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
चौकट
स्थायी समिती सदस्यसंख्येवरून राजकीय वाद
स्थायी समितीतील सदस्यसंख्या पाच की सात यावरून सभेत चांगलाच वाद रंगला. विरोधकांनी सात सदस्यांची मागणी करीत लेखी प्रस्ताव दिला; मात्र बहुमताच्या जोरावर आघाडीचा प्रस्ताव मंजूर झाला. या निर्णयाविरोधात विरोधकांनी सभात्याग करीत नाराजी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

