फ्रीजच्या कॉम्परेसरचा स्फोट

फ्रीजच्या कॉम्परेसरचा स्फोट

Published on

उल्हासनगर, ता. २१ (बातमीदार) : घरातील सर्व सदस्य गाढ झोपेत असताना मध्यरात्री फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन घर व पत्र्यांचे मोठे नुकसान झाल्याची घटना उल्हासनगरातील कॅम्प क्रमांक ४ परिसरात घडली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शाळा क्रमांक १४ परिसरातील एका घरात नानुबाई बनकर, पंकज बनकर आणि ज्योती बनकर हे तिघे राहतात. मध्यरात्री अचानक फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा जोरदार स्फोट झाला. त्यानंतर घरात आग पसरून घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले. तसेच घरावरील पत्रेही तुटून पडली. घटनेची माहिती मिळताच शिवसेनाचे उपजिल्हाप्रमुख व महापालिका गटनेते अरुण आशान यांनी अमर जग्यासी, नितीन सपकाळ व स्वीय सहाय्यक राहुल इंगळे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घराची पाहणी करून बनकर कुटुंबाला धीर दिला व आर्थिक मदतीचे आश्वासन दिले. दुसऱ्याच दिवशी नवीन पत्र्यांची व्यवस्था करून तसेच नानुबाई बनकर यांच्या हाती आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. घराची पाहणी करताना स्फोटाची तीव्रता मोठी असल्याचे निदर्शनास आले. तिघांनाही कोणतीही दुखापत झाली नाही. परिसरातील नागरिक म्हणून मदतीचा हात देणे हे आपले कर्तव्य असल्याचे अरुण आशान यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com