महिलेचा जंतू संसर्गामुळे मृत्यू

महिलेचा जंतू संसर्गामुळे मृत्यू

Published on

कासामधील महिलेचा जंतूसंसर्गामुळे मृत्यू

कासा, ता. २१ (बातमीदार) : कासा बुद्रुक येथील मीना महेंद्र राऊत (वय ३१) यांचा जंतूसंसर्गामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गुरुवारी (ता. १९) संध्याकाळी ही घटना घडली आहे.
मीना राऊत या नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या असताना त्यांना अचानक उलटीचा तीव्र त्रास सुरू झाला. ही माहिती कळताच पती महेंद्र राऊत यांनी त्यांना तातडीने घरी आणून प्राथमिक आरोग्य केंद्र, तलवाडा येथे उपचारासाठी दाखल केले. तेथील डॉक्टरांनी उपचार करण्याचा प्रयत्न केला; मात्र उलट्यांमुळे त्यांची प्रकृती खालावली होती. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले होते. तसेच जंतूसंसर्ग झाल्याचे निदर्शनास आले. सुमारे एक तास उपचार केल्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना सायंकाळी ६.३०च्या सुमारास कासा उपजिल्हा रुग्णालय पाठविण्यात आले. सायंकाळी ६.४८ वाजता अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी उपचार सुरू केले; मात्र सायंकाळी ७.५५ वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. कासा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले, की दाखल करताना त्यांची अवस्था अत्यंत गंभीर होती. मृत महिलेचे पती महेंद्र राऊत यांनी सांगितले, की गेल्या काही दिवसांपासून त्यांना असा त्रास जाणवत होता; मात्र गुरुवारी उलट्यांचे प्रमाण अधिक वाढले. मीना राऊत यांची दुसरी प्रसूती अवघ्या २० दिवसांपूर्वीच झाली होती. त्यांच्या पश्चात दोन लहान मुले असून त्यांचे पती हे शेतकरी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com