कीर्तीकर  राज्यसभा निवडणूक लढवणार?

कीर्तीकर राज्यसभा निवडणूक लढवणार?

Published on

कीर्तिकर राज्यसभा निवडणूक लढवणार?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेणार भेट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : राज्यसभेच्या आगामी निवडणुकीत पक्षाने संधी दिल्यास शिवसेनेचे (शिंदे गट) ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांची निवडणूक लढवण्याची तयारी असून त्यासंदर्भात ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेणार आहेत.
मागील लोकसभा निवडणुकीत वायव्य मुंबई मतदारसंघातून त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर हे शिवसेनेतर्फे (उद्धव गट) निवडणूक लढवत होते. त्यामुळे शिंदे गटाने तेथून त्यांच्याविरुद्ध रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे गजानन कीर्तिकर यांना संधी मिळाली नाही; मात्र तरीही त्यांनी विविध मार्गाने जनतेची कामे करण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. अशा स्थिती पुन्हा संधी मिळाल्यास ते निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. यासंदर्भात ते लवकरच शिंदे यांची भेट घेऊन पक्षसेवेची आणि जनसेवेची संधी देण्याची मागणी करणार आहेत, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
राज्यसभेवरील महाराष्ट्रातील सात खासदारांची मुदत ७ एप्रिलला संपत असून त्यासाठी १६ मार्चला मतदान होईल. शरद पवार, रामदास आठवले, प्रियंका चतुर्वेदी, फौजिया खान, भागवत कराड, धैर्यशील पाटील, रजनी पाटील यांच्या जागांवर या निवडणुका होतील. पक्षीय बलाबल पाहून तसेच ऐनवेळी वाटाघाटी होऊनच भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी यांनी किती जागा लढवाव्यात, याबाबत अंतिम निर्णय होईल.

स्व. बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू शिलेदार
२० वर्षे आमदार, त्यातील पाच वर्षे मंत्री आणि दहा वर्षे खासदार अशी कारकीर्द असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर हे स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार होते. सुधीर जोशी यांच्यानंतर स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाची व्याप्ती वाढविण्यात कीर्तिकर यांचा मोठा वाटा होता. त्याचप्रमाणे आणि राज्यात व केंद्रात मंत्रिपद असतानादेखील कीर्तिकर यांनी वेगवेगळ्या मार्गांनी जनतेचे तसेच मतदारसंघातील अनेक प्रश्न सोडवले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com