विमानतळावर राहुल गांधींचे काँग्रेसकडून जंगी स्वागत
मुंबईत राहुल गांधींचे जंगी स्वागत
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची भाजपवर टीका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शनिवारी (ता. २१) एका न्यायालयीन प्रकरणासाठी भिवंडीत जाण्याकरिता मुंबई विमानतळावर आले होते. त्याप्रसंगी काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.
विमानतळावर राहुल गांधी यांचे स्वागत केल्यानंतर प्रसारमाध्यमांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, की राहुल गांधी हे निडर नेते आहेत. ते भाजपच्या किरकोळ धमक्यांना घाबरणार नाहीत. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत शंभरपेक्षा अधिक वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अवमानकारक विधाने केली आहेत. त्यांचा निषेध करण्याचे धाडस भाजपने करून दाखवावे. ऑपरेशन सिंदूर सुरू असताना युद्धविरामची घोषणा अमेरिकेतून डोनाल्ड ट्रम्प यांनी का केली? देशातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा अमेरिकेबरोबरचा व्यापार करार दबावाखाली का केला? डोनाल्ड ट्रम्प भारताची दररोज बदनामी करत आहेत, त्याची काळजी भाजपने करावी. राहुल गांधी यांच्याविरोधात आंदोलन करून भाजप स्वतःचेच हसे करून घेत आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. या वेळी काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, माजी मंत्री आमदार अस्लम शेख, आमदार अमिन पटेल, आमदार ज्योती गायकवाड, राष्ट्रीय सचिव कुणाल चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष राजेश शर्मा आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

