प्रतापगड पर्व कार्यक्रमाने अलिबागकर भारावले

प्रतापगड पर्व कार्यक्रमाने अलिबागकर भारावले

Published on

प्रतापगड पर्व कार्यक्रमाने अलिबागकर भारावले
अलिबाग, ता. २१ (वार्ताहर) ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अलिबागमध्ये गुरुवारी (ता.१९) प्रतापगड पर्व कार्यक्रमातून शिवचरित्राचे सादरीकरण करण्यात आले. अलिबाग येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गाज फाउंडेशन आणि मनस्विनी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतापगड पर्व हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात शिवरायांच्या जीवनातील निवडक स्फूर्तीदायक प्रसंगांचे नाट्य-संगीताच्या माध्यमातून प्रभावी सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमास अलिबागकरांसह शिवप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचे शौर्य, दूरदृष्टी, लोकाभिमुख राज्यकारभार आणि स्वराज्याची संकल्पना यांचे प्रभावी दर्शन घडविण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक गाज फाउंडेशनचे रघुजीराजे आंग्रे आणि मनस्विनी चॅरिटेबल ट्रस्टचे ॲड. मानसी संतोष म्हात्रे होते. मावळा प्रतिष्ठानचे आकाश राणे, यतिराज पाटील, सिद्धार्थ नाईक, शुभम नखाते व सहकाऱ्यांनी देखील सहकार्य केले.
कार्यक्रमास नगराध्यक्षा अक्षया नाईक, शेकाप राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, पोलिस निरीक्षक किशोर साळे, माजी नगराध्यक्ष तथा वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक, नगरसेवक प्रदीप नाईक, संतोष गुरव, समीर ठाकूर, अनिल चोपडा, ॲड. श्वेता पालकर, ॲड. अंकित बंगेरा, जमाल सय्यद आणि सर्व नगरसेवक उपस्थित होते. विरोधी पक्षनेते संदीप पालकर, जिल्हा परिषद सदस्या आदिती नाईक व प्रियदर्शनी पाटील, माजी सदस्य संजय पाटील आणि भारतीय जनता पक्ष जिल्हा सरचिटणीस ॲड. महेश मोहिते यांच्यासह विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली.
कार्यक्रमाचे निवेदन अक्षय चंदेल यांनी केले. संगीत सादरीकरणात श्रेयश साळवी व शुभम गरुड (तबला), अनिरुद्ध सराफ (बासरी), हिते क्षिरसागर (सिंथेसायझर), श्रवण दौंड (पखवाज), धीरज बडे (ढोलकी), गोविंद चौधरी (तालवाद्य), ऋग्वेद वंगारी (ढोल व डफ) यांचा सहभाग होता. कोरस गटात ओम घेबड, शुभम शिंदे, अभिजीत गुरव आणि प्रणव काकडे यांनी साथ दिली. नाट्य सादरीकरणात सुरज इंगवले यांनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारली, तर ओमकार (बाजी) पांडव यांनी कवीभूषण, अनिल सावंत यांनी अफजल खान/नेतोजी आणि ऋग्वेद पुंडकर यांनी गोपीनाथ पंत यांच्या भूमिका केल्या. पडद्यामागील कार्य अभिषेक कोळी यांनी सांभाळले. राजवारसा प्रोडक्शन निर्मित या कार्यक्रमासाठी गीतकार संतोष सातपुते यांचे विशेष योगदान होते. सूत्रसंचलन प्रतिम सुतार यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com