सत्याग्रह महाविद्यालयात ‘रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज’ विषयावर चर्चासत्र

सत्याग्रह महाविद्यालयात ‘रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज’ विषयावर चर्चासत्र

Published on

सत्याग्रह महाविद्यालयात ‘रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज’ विषयावर चर्चासत्र

खारघर, ता. २१ (बातमीदार) : येथील सत्याग्रह महाविद्यालय आणि डॉ. जी. के. डोंगरगावकर विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त “रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि समकालीन समाजातील आव्हाने” या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी शिवाजी महाराज हे कोणत्याही धर्म, जात, वंश किंवा प्रांतापुरते मर्यादित नसून समता, बंधुभाव व समान संधी यांचा संदेश देणारे आदर्श राज्यकर्ते असल्याचे प्रतिपादन केले.

प्राचार्य वनिता सूर्यवंशी, प्राचार्य नेहा राणे, डॉ. सबीता नाथ, डॉ. निधी अग्रवाल, डॉ. सुभा नाडर, प्रा. संदीप अवघडे व ललिता यशवंते यांनी शिवचरित्रातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. या कार्यक्रमास सिद्धार्थ शाळा, अजिंठा शाळा, डॉ. जी. के. डोंगरगावकर इंटरनॅशनल स्कूल तसेच डॉ. नेल्सन मंडेला आश्रम स्कूल येथील शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. चर्चासत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com