धुतूम ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्‍घाटन

धुतूम ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्‍घाटन

Published on

धुतूम ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्‍घाटन
उरण, ता. २१ (वार्ताहर) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर धुतूम ग्रामपंचायतीच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांच्या हस्ते गणेश व शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जिर्ण झालेल्या इमारतीचे ग्रामनिधीतून नूतनीकरण करण्यात आले असून या नव्या कार्यालयामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजाला गती मिळणार आहे. यावेळी ग्रामपंचायतीचे प्रथम सरपंच स्व. रामदासशेठ नारायण ठाकूर यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाला काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, डॉ. मनिष पाटील, प्रियांका मढवी, निर्मला घरत, गटविकास अधिकारी सजैराव पाटील यांच्यासह माजी पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामविकासासाठी हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे मान्यवरांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com