शिवरायांवरील पुस्तकावर लेखक आपल्या भेटीला
शिवरायांवरील पुस्तकावर लेखक आपल्या भेटीला
नेरूळ, ता. २१ (बातमीदार) : नवरंग साहित्य संस्कृती आणि कला मंडळ नवी मुंबई यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त सिवूड येथील म्हात्रे नर्सरी येथे काशीनाथ मढवी लिखित ‘जगातील सर्वोत्तम राजा छत्रपती शिवाजी’ या पुस्तकावर “लेखक आपल्या भेटीला” या मुलाखत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला साहित्यरसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मंडळाचे अध्यक्ष गजानन म्हात्रे यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. घनश्याम परकाले यांनी लेखक काशीनाथ मढवी यांची मुलाखत घेतली. यावेळी नाट्यकर्मी रवी वाडकर, लेखिका पाकिजा आत्तार, लेखक सर्जेराव कुईगुडे व डॉ. अविनाश पाटील यांनी विचार मांडले. उल्का सावंत व अनन्या साठे यांनी शिवगर्जना सादर केली, तर हरिश्चंद्र माळी व विलास राजुरकर यांनी शिवकाव्य व शिवगीत सादर केले. कार्यक्रमासाठी मंडळ सदस्यांनी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

