अमेरिकन बाजारपेठेत कोकण हापूसची झेप, मुंबईकरांसाठी मात्र आंबा महाग होण्याची शक्यता

अमेरिकन बाजारपेठेत कोकण हापूसची झेप, मुंबईकरांसाठी मात्र आंबा महाग होण्याची शक्यता

Published on

अमेरिकन बाजारपेठेत कोकण हापूसची झेप
मुंबईकरांसाठी मात्र आंबा महागण्याची शक्यता
जुईनगर, ता. २१ (बातमीदार) : अमेरिकेकडून भारतीय हापूस आंब्यावर आकारले जाणारे १८ ते ५० टक्क्यांपर्यंतचे आयात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने आंबा निर्यात क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. निर्यातदारांच्या अंदाजानुसार, यंदा हंगामात दररोज सुमारे पाच हजार पेट्या आणि एकूण १० हजार टनांपर्यंत आंबा परदेशात पाठवला जाऊ शकतो. यामुळे निर्यात वाढून शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शुल्क माफीमुळे भारतीय हापूस अमेरिकन बाजारात स्पर्धात्मक दरात उपलब्ध होईल. यापूर्वी जास्त शुल्कामुळे भारतीय आंबा महाग पडत होता. विशेषतः कोकणातील रत्नागिरी व देवगड पट्ट्यातील उत्पादकांना याचा सर्वाधिक फायदा होण्याची अपेक्षा आहे. यंदा अवकाळी पाऊस आणि थ्रिप्स या किडीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट झाली आहे. काही भागांत फळधारणा कमी झाली, तर काही ठिकाणी फळांची गुणवत्ता प्रभावित झाली. तरीही शुल्क रद्द झाल्याने निर्यात वाढल्यास कमी उत्पादन असूनही शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू शकतो. उत्पादन घटले असले तरी निर्यात मागणी वाढली तर बाजारभाव स्थिर किंवा वाढत्या पातळीवर राहू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

स्थानिक बाजारात आवक कमी
निर्यात वाढल्याने राज्यातील स्थानिक बाजारात आवक कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः मुंबई आणि उपनगरांमध्ये आंब्याचा पुरवठा मर्यादित राहू शकतो. त्यामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये आंब्याचे दर वाढू शकतात. आंबा आवक कमी राहिल्यास सुरुवातीला जास्त दर द्यावा लागू शकतो. तर हंगामाच्या मध्यात किमती स्थिर होण्याची शक्यता असून, ग्राहकांना हंगामाच्या सुरुवातीला जास्त दर मोजावा लागण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com