नागरी प्रश्नांवर तातडीने कार्यवाहीची मागणी
पनवेल, ता. २१ (बातमीदार) : प्रभाग क्रमांक १८ मधील वाहतूक, नागरी सुविधा व पाणीपुरवठ्याच्या विविध समस्यांबाबत नगरसेविका ममता प्रीतम म्हात्रे यांनी पाहणी दौरा करून आयुक्तांना लेखी निवेदन सादर करत तातडीच्या कार्यवाहीची मागणी केली आहे. गार्डन हॉटेल सिग्नल परिसरातील ठाणा नाका जोडणारा अरुंद रस्ता वळणावरील अवजड वाहने व एनएमएमटी बसमुळे वारंवार कोंडी होत आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी रस्ता रुंदीकरणाची मागणी त्यांनी केली. पाडा मोहल्ला व भुसार मोहल्ला भागात नालेसफाई, तुटलेली गटारे, पेव्हरब्लॉक बसवणे व काँक्रीटीकरणाची कामे प्रलंबित असल्याबाबतही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. याकूब बेग हायस्कूल ते कच्छी मोहल्ला दरम्यान नाला दुरुस्ती व स्लॅब बसवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. महर्षी वाल्मिकीनगर येथे पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याच्या तक्रारीवर संबंधित लाईनमनला बोलावून तत्काळ निवारण करण्यात आले. यापुढे नियमित व योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले असून प्रलंबित कामांवर सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे नगरसेविकांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

