राहुल गांधी यांना 
दाखविले काळे झेंडे

राहुल गांधी यांना दाखविले काळे झेंडे

Published on

राहुल गांधी यांना
दाखविले काळे झेंडे
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : लाेकसभेतील विराेधी पक्षनेते राहुल गांधी शनिवारी (ता. २१) भिवंडी न्यायालयात सुनावणीसाठी आले हाेते. या वेळी मुंबईहून भिवंडीच्या दिशेने जाताना आनंदनगर टाेलनाक्यावर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून निषेध केला. अचानक झालेल्या या आंदाेलनामुळे काही वेळ परिसरात तणावाचे वातावरण पसरले हाेते. पाेलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, काॅँग्रेसने या आंदाेलनप्रकरणी सरकार आणि पाेलिस प्रशासनाचा निषेध केला आहे.

भिवंडी जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात राहुल गांधी यांच्याविरोधात राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघाची बदनामी केल्याप्रकरणी मानहानीचा खटला सुरू आहे. त्याच्या सुनावणीसाठी ते आले हाेते. राहुल गांधी हे वारंवार देशाची प्रतिमा जागतिक स्तरावर मलिन करत असल्याचा आराेप करून त्याच्या निषेधार्थ भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे आंदाेलन केल्याचे भाजप पदाधिकारी समर्थ नायक यांनी सांगितले. विराेधी पक्षनेते असलेल्या राहुल गांधी यांच्या ताफ्यासमाेर अचानक झालेल्या या आंदाेलनामुळे पाेलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. या आंदाेलनामुळे परिसरात काही वेळ वाहतुकीवर परिणाम झाला हाेता; मात्र काेणताही अनुचित प्रकार घडलेला नाही, असे पाेलिसांनी सांगितले. दरम्यान, शिवसेनेने ठाणे आणि मुंबईत राहुल गांधी यांच्याविराेधात निषेध आंदाेलन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com