स्वराज्य मित्र मंडळातर्फे शिवजन्मोत्सव साजरा
स्वराज्य मित्र मंडळातर्फे शिवजन्मोत्सव साजरा
कल्याण (वार्ताहर) : कल्याण पश्चिमेतील स्वराज्य मित्र मंडळातर्फे गुरुवारी (ता. १९) शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. ‘पावनखिंड’ देखावा, भजन-कीर्तन अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे या वेळी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात माजी नगरसेवक तथा शिवसेना उपशहरप्रमुख सुनील वायले यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमादरम्यान डॉ. तनुजा वायले आणि प्रमिला पाटील, किरण भांगले या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सहभाग लाभला.
शिवजयंतीनिमित्त शोभा यात्रेचे नियोजन करण्यात आले होते. यात प्रामुख्याने गृहसंकुलातील मुला-मुलींनी राज्याभिषेक सादरीकरण केले. काही महिलावर्गाने देवींचे स्वरूप साकारले. अन्य महिला, युवती आणि लहान मुलींनी लेझीम खेळ सादर केले. लहान मुले तथा युवक-युवतींनी शिवकालीन मर्दानी खेळ लाठी-काठी, दांडपट्टा, ढाल-तलवार, बाणाकाटा, उरुमी अशा साहसी खेळाचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
स्वराज्य मित्र मंडळ युवक-युवतींनी आजच्या युगातील लुप्त होत चाललेली भारतीय संस्कृती आणि साहसी खेळाचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमात नवनिर्वाचित महापौर हर्षाली चौधरी, माजी आमदार नरेंद्र पवार, शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील, नगरसेवक तथा नगरसेविका शालिनी वायले, शामल गायकर, उल्हास भोईर, रवी गायकर, कावेरी देसाई, कल्पेश देसाई आदी समाजसेवकांची प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शनपर उपस्थिती लाभली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

