छत्रपती शिवाजी महाराज दालनाचे
छत्रपती शिवाजी महाराज दालनाचे उद्घाटन
विरार (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विरार येथील नॅशनल इंग्लिश शाळेत महाराजांची युद्धकला, त्यांचा जन्म, रोहिडेश्वरावरील स्वराज स्थापनेची शपथ अशा चित्रांच्या दालनाचे उद्घाटन दीपक कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून वसई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप पंडित आणि इतर उपस्थित होते. या कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम, महाराजांच्या जीवनावरील नाट्यछटा सादर केल्या. शाळेतल्या मुलींनी गायलेल्या प्रतापगडावरील अफझलखान भेटीच्या पोवाड्याने सर्वांची मने प्रफुल्लित केली. शाळेतील मुलांना महाराजांचा इतिहास कळावा, यासाठी शाळेच्या पाचव्या मजल्यावर चित्रकला शिक्षक विराज जोशी, निरंज मिश्रा, सिद्धेश चिंदरकर आणि राहुल होवाळ यांनी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रांचे दालन तयार केले असून, त्याचे उद्घाटन शाळेचे संस्थापक दीपक कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमला तनुजा कुलकर्णी, रुपाली पाटील यांच्यासह इतर शिक्षक आणि पालकवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

