महानगरपालिकेत ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ उत्साहात साजरी
महापालिकेत ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ उत्साहात
विरार, ता. २२ (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६व्या जयंतीनिमित्त वसई विरार शहर महापालिकेमार्फत आज छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. महापालिका मुख्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीस महापौर अजीव पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच या वेळी उपस्थित उपमहापौर मार्शल लोपीस, आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.), अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे तसेच उपस्थित नगरसेवक, नगरसेविका महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी, महाराजांच्या शौर्याविषयी, पराक्रमाविषयी तसेच शिवजयंतीविषयीच्या माहितीचे वाचन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’चा निनाद करून महाराजांना मानाचा मुजरा केला. उपस्थितांनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषामुळे संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

