कल्याणच्या एसीपी ऑफिसमध्ये नागाला पकडण्यात सर्पमित्राला यश

कल्याणच्या एसीपी ऑफिसमध्ये नागाला पकडण्यात सर्पमित्राला यश

Published on

कल्याणच्या एसीपी कार्यालयात ५ फुटी नाग
कल्याण, ता. २२ (वार्ताहर) : कल्याण येथील एसीपी कार्यालय परिसरात नाग जातीचा साप आढळून आला. या सापाला सुरक्षितरित्या पकडण्यात आले असून कल्याण वन विभागाच्या ताब्यात दिला आहे.
सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालय परिसरात नाग आढळल्याने कर्मचाऱ्यांची एकच पळापळ झाली. साप असल्याची माहिती मिळताच शिवगर्जना गिरिभ्रमण संस्थेचे सदस्य आणि सर्पमित्र सतीश बोबडे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कोणतीही इजा न होता नागाला सुरक्षितरित्या पकडले. सुमारे ५ ते ५.३० फूट लांबीच्या या नागाला वन विभागाच्या ताब्यात दिले आहे. विशेष म्हणजे, गेल्या २५ वर्षांत प्रथमच जोशीबाग परिसरात नाग जातीचा साप आढळल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

Marathi News Esakal
www.esakal.com