आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांनी अनुभवली ''गोरेगाव चित्रनगरी
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांनी अनुभवली ‘चित्रनगरी’
मुंबई, ता. २२ : गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत गुरुवारी (ता. १९) यवतमाळमधील शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा महिलांनी भेट दिली. या महिलांना संपूर्ण चित्रनगरी फिरण्याची संधी मिळाली. आतापर्यंत दूरदर्शनच्या पडद्यावर ज्या मालिका, चित्रपट पाहिले, त्याचे चित्रीकरण प्रत्यक्ष पाहताना महिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. या महिलांचे चित्रनगरीचे सह-व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी स्वागत केले.
यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे ‘रसिकाश्रय’ संस्था ही गेल्या २५ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेच्या वतीने दरवर्षी ‘जीवाची मुंबई’ हा उपक्रम राबविला जातो. यावर्षी या उपक्रमाच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्याच्या दुर्गम भागातील पतीच्या निधनानंतर शेती आणि घराची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिलांना गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीची सफर घडवून आणण्यात आली.
आजवर ज्या मालिका आणि चित्रपट केवळ दूरदर्शनच्या पडद्यावर पाहिले होते, त्याचे प्रत्यक्ष चित्रीकरण कसे चालते, भव्य सेट कसे असतात आणि कलाकार प्रत्यक्षात कसे दिसतात, याचा प्रत्यक्ष अनुभव महिलांनी या सहलीच्या माध्यमातून घेतला. या वेळी महिलांना चित्रीकरण कसे चालते याविषयी मार्गदर्शनदेखील करण्यात आहे. गोरेगाव चित्रनगरीत या महिलांचे आगमन झाले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह आणि कुतूहल पाहायला मिळाले. आम्ही कधी स्वप्नातही विचार केला नव्हता, की मुंबईला येऊन चित्रनगरी प्रत्यक्ष पाहायला मिळेल, अशी भावुक प्रतिक्रिया या वेळी अनेक महिलांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

