पर्यावरणपूरक प्रकल्पांचे लोकार्पण

पर्यावरणपूरक प्रकल्पांचे लोकार्पण

Published on

पर्यावरणपूरक प्रकल्पांचे लोकार्पण
बोईसर (वार्ताहर) : शिवजयंतीच्या औचित्याने गॅलक्सी सरफक्टंट्स लिमिटेड, तारापूर यांच्या ‘समृद्ध गाव व्हिजन’ अंतर्गत नावझे ग्रामपंचायतीत पर्जन्य जलसंधारण, सौर प्रकल्प, प्लॅस्टिक संकलन केंद्र व मधुमक्षिका पालन प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमास कंपनीचे फॅक्टरी मॅनेजर राजेश खटावकर, सीएसआर प्रमुख अमरजीत दास यांच्यासह कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामसेवक, महिला बचत गटातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्जन्य जलसंधारणमुळे भूजल पातळी वाढीस मदत होणार असून, सौर प्रकल्पाद्वारे वीज वाचवण्यास चालना मिळणार आहे. प्लॅस्टिक संकलन केंद्रामुळे कचरा व्यवस्थापन सुलभ होईल, तर मधुमक्षिका पालनातून स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. या वेळी मान्यवरांनी ग्रामपंचायतीला ‘माझी वसुंधरा’ अभियानातील राज्यस्तरीय यशाबद्दल अभिनंदन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वावलंबनाच्या विचारांना साजेसा हा उपक्रम असल्याची भावना या वेळी व्यक्त करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com