जादा परताव्याचे प्रलोभन दाखवून 
गुंतवणूकदारांना लाखोंचा गंडा

जादा परताव्याचे प्रलोभन दाखवून गुंतवणूकदारांना लाखोंचा गंडा

Published on

नवी मुंबई, ता. २२ (वार्ताहर) : जादा परताव्याचे प्रलोभन दाखवून गुंतवणूकदारांना गंडा घालण्याचे सत्र सुरूच आहे. नेरूळमध्ये एका व्यक्तीने गुंतवणूकदारांची २० लाख ७५ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रवीण रमेश चव्हाण (वय ४६) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. अनेक गुंतवणूकदारांची लाखोंची फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

प्रवीण चव्हाण हा नेरूळ सेक्टर १६ मधील घरकुल सोसायटीत राहण्यास आहे. त्याने २०१९ मध्ये कॅपिटल ट्रेडिंग ॲण्ड इन्व्हेस्टमेंट या नावाने आपली कंपनी असल्याचे भासवले होते. तसेच त्याने त्याच्या ओळखीतील व्यक्तींना व इतर गुंतवणूकदारांना कंपनीच्या आकर्षक योजना सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर चव्हाण याने दरमहा आकर्षक परतावा देण्याचे आश्वासन देऊन ऑगस्ट २०१९ ते एप्रिल २०२४ या कालावधीत, अनेक गुंतवणूकदारांकडून लाखो रुपये उकळले. सुरुवातीला काही काळ लोटल्यानंतर गुंतवणूकदारांनी आपल्या पैशांचा आणि परताव्याचा तगादा लावला असता चव्हाण याने पैसे परत न करता टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. गुंतवणूकदारांनी हक्काचे पैसे मागितले असता त्याने काही गुंतवणूकदारांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकीही दिली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादींनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. बेलापूर येथील सत्र न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com