मराठी साहित्य मंडळ, पेण तर्फे ‘आधारवड’ सन्मान
मराठी साहित्य मंडळ पेणतर्फे ‘आधारवड’ सन्मान
पेण, ता. २२ (बातमीदार) : १९६२ला स्थापन झालेल्या मराठी साहित्य मंडळ, पेणच्या वतीने मराठी भाषा गौरवदिनाचे औचित्य साधून संस्थेच्या वाटचालीत बहुमोल योगदान देणाऱ्या ज्येष्ठ सभासदांचा ‘आधारवड’ सन्मान करण्यात आला. मंडळाचे माजी अध्यक्ष व सचिव विलास फडके यांना सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या साहित्य व संघटनात्मक कार्याचा या वेळी विशेष उल्लेख करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्ष डॉ. देवीदास बामणे, उपाध्यक्ष प्राचार्य सतीश पोरे, सचिव धनावडे, खजिनदार जोशी, सदस्य दत्ता गोखले, गोरे, माजी अध्यक्ष विभावरी जोशी, माजी सचिव बाळकृष्ण कवळकर यांच्यासह अनेक साहित्यप्रेमी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

