पुणे लिंक रोडवर जलवाहिनीचा व्हॉल्व्ह फुटला; हजारो लिटर पाण्याची नासाडी
जलवाहिनीचा व्हॉल्व्ह फुटला
पुणे लिंक रोडवर हजारो लिटर पाण्याची नासाडी
कल्याण, ता. २२ (बातमीदार) : कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोडवर आधीच एका बाजूला सुरू असलेल्या जलवाहिनीच्या कामामुळे अपघातांचे सत्र सुरू असतानाच, रविवारी (ता. २२) सकाळी एक दुर्घटना घडली. प्रभाग ड कार्यालयासमोरील काटेमानिवली टाकीजवळील जलवाहिनीचा मुख्य व्हॉल्व्ह अचानक फुटल्याने हजारो लिटर पाणी वाहून गेले. यामुळे संपूर्ण पुणे लिंक रोडला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
सकाळच्या सुमारास व्हॉल्व्ह फुटल्याने पाण्याचे प्रचंड लोंढे बाहेर पडू लागले. पाण्याचा दाब इतका मोठा होता, की काही वेळातच रस्ता जलमय झाला. साचलेल्या पाण्यामधून मार्ग काढताना वाहनचालकांसह पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली आहे. परिणामी, कल्याण पूर्वेतील प्रभाग ड आणि जे अंतर्गत येणाऱ्या भागातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळित झाला होता.
घटनेची माहिती मिळताच महापालिका प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत पाणीगळती रोखण्यासाठी मुख्य पुरवठा बंद करण्यात आला असून दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. व्हॉल्व्ह फुटल्यामुळे झालेली गळती थांबवण्यात प्रशासनाला यश आले आहे. त्यानंतर परिसराचा पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात येईल, असे सहाय्यक आयुक्त उमेश यमगर म्हणाले.
पुणे लिंक रोडवर एका बाजूला आधीच जलवाहिनी टाकण्याचे काम संथ गतीने सुरू आहे, यामुळे छोटे-मोठे अपघात होत आहेत. आता दुसऱ्या बाजूला व्हॉल्व्ह फुटल्याने प्रशासकीय नियोजनावर स्थानिक नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वारंवार होणाऱ्या अशा तांत्रिक बिघाडांमुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

