ओव्हरलोड वाहतुकीमुळे शेतात उलटला!

ओव्हरलोड वाहतुकीमुळे शेतात उलटला!

Published on

मुसारणेत खदानीच्या डम्परला अपघात
ओव्हरलोड वाहतुकीमुळे शेतात उलटला!
वाडा, ता. २३ (बातमीदार) : तालुक्यातील मुसारणे येथे दगड खदानीतून गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या एका अवजड डम्परचा आज पहाटे भीषण अपघात झाला. क्षमतेपेक्षा जास्त माल भरलेला असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि डम्पर थेट रस्त्याशेजारील शेतात जाऊन उलटला. या अपघातात शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुसारणे गावाच्या हद्दीत अनेक दगड खाणी कार्यरत आहेत. आज पहाटेच्या सुमारास गौण खनिजाची वाहतूक करणारा एक डम्पर अतिवेगाने जात असताना चालकाचा ताबा सुटला. ज्या ठिकाणी हा अपघात झाला, त्या मुख्य रस्त्यावरून दररोज शेकडो शाळकरी मुले ये-जा करत असतात. अपघात पहाटेच्या वेळी झाल्याने मोठी दुर्घटना टळली, अन्यथा भीषण जीवितहानी होण्याची शक्यता होती.

विशेष म्हणजे, २६ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये ठराव क्र. ६ नुसार खाण वाहतुकीसाठी कडक नियमावली जाहीर केली होती. यामध्ये वाहतूक फक्त सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेतच करावी, वाहनांचा वेग ताशी २० किमी पेक्षा जास्त नसावा,
ओव्हरलोड वाहतूक पूर्णपणे बंद असावी, असे स्पष्ट नियम असूनही ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनाकडून त्याची कोणतीही अंमलबजावणी होताना दिसत नाही. "कडक नियमावलीचे फलक फक्त नावापुरतेच आहेत का," असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत.

आंदोलनाचा इशारा
प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या ओव्हरलोड वाहतुकीवर तातडीने दंडात्मक कारवाई करावी आणि ग्रामसभेच्या ठरावाची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मुसारणे ग्रामस्थांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com