वणवा टाळण्यासाठी उपाययोजना आवश्यक

वणवा टाळण्यासाठी उपाययोजना आवश्यक

Published on

मुरबाड, ता. २२ (बातमीदार) : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे तालुक्यातील जंगल परिसरात वणवा लागण्याची शक्यता बळावली आहे. वणव्यामुळे वनविभागाची; तसेच खासगी वनसंपत्ती जळून जाते. शिवाय, वन्य प्राण्यांचेही मोठे नुकसान होते. त्यामुळे वणवा लागू नये, यासाठी वन विभागाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर मुरबाडे यांनी केली आहे.
मागील महिन्यात तालुक्यातील पाडाळे, मांडवत आणि खेडले या गावांच्या दरम्यान असलेल्या वन विभागाच्या जंगलात वणवा लागल्याची घटना घडली होती. त्यावेळी गवत व पालापाचोळा ओलसर असल्याने आग आटोक्यात आणणे शक्य झाले आणि मोठी जीवितहानी टळली. वनसंपदा व वन्यजीवांचे नुकसान होण्यापासून बचाव झाला. मात्र, सध्या परिस्थिती वेगळी आहे. जंगलातील पालापाचोळा पूर्णपणे सुकलेला असून उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे एकदा वणवा लागल्यास तो वेगाने पसरून नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती व्यक्त होत आहे. अशा वेळी आग विझविण्याचे काम अधिक कठीण होणार असल्याचे मुरबाडे यांनी नमूद केले.
वनसंपत्तीचे संरक्षण आणि वन्यजीवांचे जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने आणि नागरिकांनी संयुक्तपणे जबाबदारी पार पाडणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर वणवा रोखण्यासाठी आताच पावले उचलली नाहीत, तर मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आवाहन
वणवा टाळण्यासाठी जंगल परिसरात नियमित गस्त वाढवणे, अग्निरेषा तयार करणे, ग्रामस्थांना जनजागृतीद्वारे सतर्क करणे आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तसेच जंगलालगतच्या शेतकऱ्यांनी शेतीतील कचरा जाळताना खबरदारी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com