भिवंडी गुन्हे शाखेकडून सराईत दुकलीस अटक
भिवंडी, ता. २२ (वार्ताहर) : भिवंडी शहरात घरफोडी व वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यात ठाणे पोलिस आयुक्तालयांतर्गत कार्यरत भिवंडी गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत पोलिसांनी सहा गुन्ह्यांची उकल केली आहे. आरोपींकडून तब्बल सात लाख ३९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अटक केलेल्या आरोपींची नावे आजाद सिंग ऊर्फ धनरी टाक (वय ३३) आणि अजय सिंग ऊर्फ मामू दुधानी (वय २८, दोघे रा. दिडोली, सुरत, गुजरात) अशी आहेत. शहरात वाढत्या घरफोडी आणि वाहनचोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांनुसार विशेष मोहीम राबविण्यात येत होती. त्याचदरम्यान गुप्त बातमी आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीराज माळी व मिथुन भोईर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने शिताफीने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. पोलिस उपनिरीक्षक रवींद्र पाटील, राजेश शिंदे, रामचंद्र जाधव, सुधाकर चौधरी यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत आरोपींचा तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपींनी नारपोली पोलिस ठाणे हद्दीतील चार, कोनगाव पोलिस ठाणे आणि विरार पोलिस ठाणे हद्दीतील प्रत्येकी एका घरफोडी व वाहनचोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. अशा एकूण सहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून ७,३९,४०० रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने हस्तगत केले असून, पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

