अविश्वास ठरावासाठी २६ फेब्रुवारी रोजी विशेष सभेचे आयोजन

अविश्वास ठरावासाठी २६ फेब्रुवारी रोजी विशेष सभेचे आयोजन

Published on

मुरबाड नगराध्यक्षांविरोधात ‘अविश्वास ठराव’
संतोष चौधरींची खुर्ची धोक्यात; भाजप-शिवसेना युतीचे १३ नगरसेवक एकवटले; राजकीय समीकरणे फिरली

मुरबाड, ता. २३ (बातमीदार) : मुरबाड नगर पंचायतीचे नगराध्यक्ष संतोष दिलीप चौधरी यांच्या विरोधात राजकीय संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी येत्या गुरुवारी (ता. २६) रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्याचे आदेश दिले आहेत. या सभेच्या अध्यक्षस्थानी कल्याणचे प्रांताधिकारी असतील.

मुरबाड नगर पंचायतीच्या १७ सदस्यांपैकी तब्बल १३ नगरसेवकांनी नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठरावाची नोटीस दिली आहे. यामध्ये भाजपचे आठ आणि शिवसेना (शिंदे गट) पाच सदस्यांचा समावेश आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक आकडा विरोधकांकडे असल्याने संतोष चौधरींचे पद जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुरबाड नगर पंचायतीमधील सत्तासंघर्ष अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचला आहे. सुरुवातीला भाजप १०, अपक्ष दोन आणि शिवसेना पाच असे बलाबल होते. अपक्षांच्या पाठिंब्याने भाजपचे संख्याबळ १२ झाले होते. आमदार किसन कथोरे यांना शह देण्यासाठी गेल्या वर्षी भाजपचे नऊ नगरसेवक फुटले आणि त्यांनी ''परिवर्तन पॅनेल'' स्थापन केले. त्या वेळी भाजपमध्ये केवळ तीन सदस्य उरले होते. आता परिस्थिती पुन्हा उलटली आहे. फुटलेले पाच नगरसेवक पुन्हा भाजपमध्ये परतले असून, जुन्या तीन सदस्यांसह भाजपचे संख्याबळ आठवर पोहोचले आहे.

सध्याची पक्षीय स्थिती (१७ सदस्य) :
गट/पक्ष सदस्य संख्या भूमिका
भाजप ०८ अविश्वास ठरावाच्या बाजूने
शिवसेना (शिंदे गट) ०५ अविश्वास ठरावाच्या बाजूने
परिवर्तन पॅनेल ०४ नगराध्यक्षांच्या पाठीशी (संतोष चौधरींसह)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com