रोहा पंचायत समिती गटनेतेपदी किसनराव मोरे
रोहा पंचायत समिती गटनेतेपदी किसनराव मोरे
रोहा, ता.२२ (वार्ताहर) : रोहा पंचायत समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ८ पैकी ६ जागांवर विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवली आहे. सभापती व उपसभापती निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता असताना सत्ताधारी पक्षाने आपला गट स्थापन केला असून घोसाळे गणातून निवडून आलेले ज्येष्ठ सदस्य किसनराव मोरे यांची गटनेतेपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली असून सर्व सदस्यांनी जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्याकडे गटनेतेपदाचे पत्र सुपूर्द केले.
या निवडणुकीत समृद्धी कोळी, जगनाथ धनावडे, संजय मांडळुसकर, विजया पाशीलकर, सुरेश मगर व किसन मोरे हे राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. दरम्यान, सभापतीपद महिलांसाठी राखीव असल्याने विजया पाशीलकर यांचे नाव आघाडीवर असून या निवडीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
फोटो कॅप्शन : रोहा पंचायत समिती गट नेते पदा संदर्भात जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्याकडे पत्र सुपूर्द करताना सदस्य किसन मोरे,सुरेश मगर, संजय मांडळूसकर, जगन्नाथ धनावडे व समृद्धी काळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

