विविध राज्यांच्या संस्कृतीचे रंगतदार सादरीकरण

विविध राज्यांच्या संस्कृतीचे रंगतदार सादरीकरण

Published on

विविध राज्यांच्या संस्कृतीचे रंगतदार सादरीकरण
ज्ञानमंदिर हायस्कूलचा दिमाखदार दशकपूर्ती सोहळा
घाटकोपर, ता. २३ (बातमीदार) : घाटकोपर पूर्व, नालंदा नगर येथील सरस्वती एज्युकेशन ट्रस्ट संचालित ज्ञानमंदिर हायस्कूलचा दहावा वर्धापनदिन चेंबूर येथील फाईन आर्ट्स सोसायटी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या भव्य सोहळ्यास मल्लखांब विश्वगुरु व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित उदय देशपांडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष इंजि. अनिल झोरे यांच्या शालेय शिक्षिका मेघना देव यांचीही प्रमुख अतिथी म्हणून विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांचा शंभर टक्के सहभाग. विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र, गोवा, आसाम, केरळ अशा विविध राज्यांची पारंपरिक वेशभूषा साकारत त्या-त्या राज्यांची संस्कृती, लोकनृत्य आणि साहित्य यांचे प्रभावी सादरीकरण केले. संपूर्ण सभागृह भारताच्या सांस्कृतिक वैविध्याने नटले होते.
इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी स्वावलंबन, निर्णयक्षमता, देशभक्ती, आत्मसंरक्षण, नृत्य, चित्रकला, ध्वनिशास्त्रीय वाचनपद्धती, चिकित्सक विचार, विद्यार्थी बचत गट तसेच ‘माझी शाळा, माझी जबाबदारी’ अशा विविध संकल्पनांवर आधारित प्रभावी सादरीकरण करत शाळेच्या पुढील पन्नास वर्षांच्या उज्ज्वल वाटचालीचे स्वप्न उभे केले. त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण अभिनयाने उपस्थित मान्यवर, पालक आणि विद्यार्थी अक्षरशः भारावून गेले.

उल्‍लेखनीय प्रगती
अपुरी जागा, झोपडपट्टीबहुल परिसर आणि गुणवत्तापूर्ण शिक्षकांची उपलब्धता अशा अनेक अडचणींवर मागील १० वर्षांत यशस्वी मात करत शाळेने उल्लेखनीय प्रगती साधली आहे. विद्यार्थ्यांचे कलागुण, शिक्षकांची मेहनत आणि पालकांचे सहकार्य यामुळेच हा सोहळा यशस्वी ठरल्याचे मत संस्थापक-अध्यक्ष अनिल झोरे यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com