अंबाडी ग्रामपंचायत सदस्याला लाच घेताना अटक
वज्रेश्वरी, ता. २३ (बातमीदार) : अंबाडी ग्रामपंचायत हद्दीतील तळमजला अधिक तीन मजली इमारतीसंदर्भात घरपट्टी व पाणीपट्टी आकारणीसाठी; तसेच अनधिकृत बांधकामाबाबत केलेला अर्ज मागे घेण्यासाठी एक लाख ७० हजार रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील पाटील यांना रंगेहाथ अटक करण्यात आली.
तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाने संबंधित इमारतीस सीसी आणि ओसी प्राप्त झाल्यानंतर २७ ऑक्टोबर २०२५ ला अंबाडी ग्रामपंचायतीत घरपट्टी व पाणीपट्टी आकारणीसाठी अर्ज केला होता. हा अर्ज मासिक सभेत चर्चेसाठी ठेवला असता सदस्य स्वप्नील पाटील व इतर काही सदस्यांनी विरोध दर्शविला. संबंधित इमारत अनधिकृत असल्याचा आरोप करत तहसीलदारांकडे कारवाईसाठी अर्जही करण्यात आला होता. या अर्जाची प्रत २६ डिसेंबरला तक्रारदारांच्या व्हॉट्सअॅपवर पाठविल्याची माहिती आहे. त्यानंतर १८ जानेवारीला पाटील यांनी तक्रारदाराकडे घरपट्टी व पाणीपट्टी आकारणीस सहकार्य करण्यासाठी; तसेच अनधिकृत बांधकामाबाबत केलेला अर्ज मागे घेण्यासाठी एक लाख ७० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. १७ फेब्रुवारीला पडताळणी कारवाईदरम्यान लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार १८ फेब्रुवारीला सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सापळा रचण्यात आला. दुपारी १२.३४ वाजता पाटील यांना एक लाख ७० हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
कारवाईनंतर त्यांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास गणेशपुरी पोलिस ठाणे सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

