सूर्या उजवा कालवा

सूर्या उजवा कालवा

Published on

उजवा कालव्याच्या वितरण प्रणालीचे काम युद्धपातळीवर!
४५३ हेक्टर क्षेत्राला मिळणार हक्काचे पाणी; पाण्याचा अपव्यय टळणार

कासा, ता. २३ (बातमीदार) : सूर्या प्रकल्पाच्या उजव्या तीरावरील वितरिका क्रमांक १ वर बंदिस्त नलिका (जलवाहिनी) वितरण प्रणालीच्या कामाला वेग आला आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे सुमारे ४५३.६५ हेक्टर क्षेत्राला नियमित आणि नियंत्रित सिंचनाचा थेट लाभ मिळणार आहे. कासा ते भराड यादरम्यान सुमारे सहा किलोमीटर अंतरावर पाइप टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, मे अखेरपर्यंत संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला आहे. याआधी सूर्या प्रकल्पाच्या कालव्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आल्याने पाण्याची गळती लक्षणीयरीत्या कमी झाली होती. आता बंदिस्त नलिका प्रणालीमुळे उपलब्ध पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर होणार आहे.

नियंत्रित पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या गरजेनुसार मोजक्या दाबात पाणी मिळेल. बाष्पीभवन आणि गळतीमुळे वाया जाणारे पाणी वाचेल. पाणीपुरवठा सुलभ झाल्याने पिकांच्या उत्पादनात वाढ होईल. कालव्यात साचणारे सांडपाणी आणि अस्वच्छतेचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल.

सध्या जेसीबी यंत्राच्या सहाय्याने खोदकाम करून पाइप टाकले जात असून, त्यावर मातीचे आवरण दिले जात आहे. ‘‘या आधुनिक प्रणालीमुळे पाण्याचा अपव्यय टळेल आणि सिंचन व्यवस्थेची विश्वासार्हता वाढेल,’’ अशी माहिती शाखा अभियंता प्रवीण भुसारे यांनी दिली.

बंदिस्त पाइप प्रणालीमुळे शेवटच्या टोकापर्यंतच्या शेतकऱ्यांना पाणी पोहोचेल. पाणी हे अमूल्य आहे, त्यामुळे त्याचा वापर जपून करणे काळाची गरज आहे. पाटबंधारे विभागाच्या या कामामुळे निश्चितच पाणी बचतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
- आशीष चव्हाण (सामाजिक कार्यकर्ता)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com