अंबरनाथ रेशनिंग विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

अंबरनाथ रेशनिंग विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

Published on

अंबरनाथ, ता. २३ (वार्ताहर) : येथील रेशनिंग विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे सविस्तर निवेदन प्रशासकीय स्तरावर सादर करण्यात आले आहे. शहरात या प्रकरणाची चर्चा रंगली आहे. शिवसेना नगरसेवक विकास सोमेश्वर यांनी रेशन दुकानदारांच्या समस्या मांडताना विभागातील काही आर्थिक व्यवहारांची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेशन दुकानदारांना दैनंदिन कामकाज करताना काही प्रशासकीय स्तरावर तांत्रिक आणि आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सोमेश्वर यांनी निवेदनात नमूद केले आहे. काही मध्यस्थ व्यक्तींमार्फत होणाऱ्या कथित व्यवहारांमुळे दुकानदारांवर आर्थिक भार पडत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच काही संभाषणांच्या ध्वनिमुद्रणाचा उल्लेख करून या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर शहानिशा व्हावी आणि रेशन दुकानदारांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात मुंबई येथील नियंत्रक अधिकारी, ठाणे उपनियंत्रक; तसेच ठाणे गुन्हे शाखा यांच्याकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती आहे.

अधिकाऱ्यांनी आरोप फेटाळले
अंबरनाथ रेशन विभागाचे अधिकारी शशिकांत पाटसुळे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी सांगितले की, अंबरनाथ रेशनिंग विभागाने अलीकडील काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काही रेशन दुकानदारांविरोधात कडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमुळे नाराज झालेल्या काही घटकांकडून हेतुपुरस्सर दिशाभूल करणारे आरोप केले जात असण्याची शक्यता आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. विभाग पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने काम करत असून, कोणत्याही प्रकारच्या गैरव्यवहाराला थारा दिला जाणार नाही, असेही पाटसुळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com