हरणे गुरुजी विद्यालयास ‘अ +’ श्रेणी
हरणे गुरुजी विद्यालयास ‘अ +’ श्रेणी
वांद्रे, ता. २३ : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (एसक्यूएएएफ) अंतर्गत झालेल्या बाह्य मूल्यांकनात इंडियन एज्युकेशन सोसायटी, हरणे गुरुजी विद्यालयाने ‘अ +’ श्रेणी प्राप्त केली आहे. शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता, अध्यापन प्रक्रिया, शालेय व्यवस्थापन, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तसेच गुणवत्ता सुधारणा उपक्रमांतील उत्कृष्ट कार्य यांचा विचार करून ही श्रेणी प्रदान करण्यात आली आहे.
या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणाल्या की, ही ‘अ +’ श्रेणी आमच्या शाळेतील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. गुणवत्तापूर्ण, मूल्याधिष्ठित शिक्षण देण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे अधोरेखित झाला असून, भविष्यातही शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी आम्ही कटिबद्ध राहू. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे व्यवस्थापन, शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालकवर्ग यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

