डंपरच्या धडकेनंतर टिटवाळ्यात संताप उसळला;
डंपरच्या धडकेनंतर टिटवाळ्यात संताप उसळला
स्वतंत्र वाहतूक विभागासाठी ‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ’ची थेट पोलीस महासंचालकांकडे धाव
टिटवाळा, ता. २३ (वार्ताहर) : भरधाव डंपरच्या धडकेने टिटवाळा शहर हादरले असून, या घटनेने शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अवजड वाहनांची वर्दळ आणि अपुरी नियंत्रण यंत्रणेमुळे अपघातांचा धोका वाढत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांच्या वतीने ॲड. जितेंद्र जोशी यांनी पोलिस अधीक्षक ठाणे कार्यक्षेत्रात स्वतंत्र वाहतूक विभाग तातडीने स्थापन करण्याची मागणी केली आहे.
नुकत्याच घडलेल्या डंपर अपघातात काही जखमी झाले असून अनेक वाहनांचे नुकसान झाले होते. यासोबतच मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. टिटवाळ्यासारख्या शहरात स्वतंत्र वाहतूक शाखा नसणे ही चिंतेची बाब असल्याचे मत व्यक्त होत आहे. सध्या उपलब्ध पोलिस मनुष्यबळावरच वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी असल्याने कायदा-सुव्यवस्था आणि वाहतूक व्यवस्थापन या दोन्ही आघाड्यांवर ताण निर्माण होत आहे. या मुद्द्याचा पाठपुरावा करत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांच्या वतीने ॲड. जोशी यांनी पोलिस महासंचालक यांची सुनियोजित भेट मिळावी यासाठी अधिकृत अर्ज सादर केला आहे. भेट निश्चित झाल्यानंतर या विषयावर सविस्तर चर्चा करून स्वतंत्र वाहतूक विभागाची स्थापना, आवश्यक अधिकारी व कर्मचारी नियुक्ती आणि प्रभावी अंमलबजावणी याबाबत ठोस निर्णय व्हावा, यासाठी ते प्रखरपणे आग्रही राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

