डॉ. कैलास पवार यांना प्रतिष्ठेचा ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न’ पुरस्कार

डॉ. कैलास पवार यांना प्रतिष्ठेचा ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न’ पुरस्कार

Published on

डॉ. कैलास पवार यांना ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न’ पुरस्कार
ठाणे शहर, ता. २३ (बातमीदार) ः ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांना राज्य सरकारच्या प्रतिष्ठेचा ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार’ ने सन्मानित करण्यात आले आहे. राज्य शासनाने त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित केले. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराने ठाणे जिल्ह्यच्या मुकुटात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे पार पडलेल्या समारंभात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, उपमहापौर संजय घाडी, आरोग्य सचिव ई. रविंद्रन, आरोग्य आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते डॉ. पवार यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक प्रदान केले. विविध क्षेत्रांतील मान्यवर, आरोग्य अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला. डॉ. पवार यांनी ‘रुग्ण प्रथम’ हे ब्रीद जपत गरीब, वंचित वर्गाला आरोग्य सेवा दिली. कोरोनाच्या भीषण काळात त्यांनी दाखवलेले नेतृत्व, काटेकोर नियोजन आणि समन्वय कौशल्य कमालीचे प्रभावी होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही रुग्णांना योग्य उपचार, आवश्यक सुविधा आणि मानसिक आधार मिळावा यासाठी त्यांनी दिवस-रात्र परिश्रम घेतले होते.

Marathi News Esakal
www.esakal.com