ठाणे जिल्हा नुकसानग्रस्त जाहीर करा

ठाणे जिल्हा नुकसानग्रस्त जाहीर करा

Published on

पडघा, ता. २३ (बातमीदार) : अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भिवंडी तालुक्यासह ठाणे जिल्ह्याला सरकारने नुकसानग्रस्त घोषित करावे, अशी मागणी भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; तसेच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्राद्वारे निवेदन दिले आहे.
सप्टेंबर व ऑक्टोबर २०२५ मध्ये भिवंडी तालुक्यासह ठाणे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विशेषतः भातपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. अनेक ठिकाणी कापणीस तयार असलेली पिके पाण्याखाली जाऊन कुजल्याचे प्रकार घडले. राज्य सरकारने नुकसानग्रस्त जिल्ह्यांचा अहवाल संबंधित विभागांना सादर केला असला, तरी त्यामध्ये जिल्ह्याचा अंशतःही समावेश नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सरकारने या निर्णयाचा तातडीने फेरविचार करून अहवालात दुरुस्ती करावी आणि भिवंडी तालुक्यासह ठाणे जिल्हा आणि कोकणातील इतर बाधित जिल्ह्यांचा समावेश करावा, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. अतिवृष्टी होऊनही ठाणे जिल्ह्याला नुकसानग्रस्त घोषित न करणे हा अन्यायकारक निर्णय ठरेल, असेही मत व्यक्त करण्यात आले आहे. तसेच नुकसानभरपाईचे निकष व प्रत्यक्ष पंचनाम्यांबाबत स्पष्टता आणावी आणि निर्णय होईपर्यंत शेतकऱ्यांकडून शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची वसुली करू नये, अशी मागणीही आमदार मोरे यांनी केली आहे.

भिवंडी तालुक्यासह ठाणे जिल्ह्यात २०२५ मध्ये अवकाळी व अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाधित भागाला नुकसानग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
- शांताराम मोरे, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com