ठाणे पालिकेच्या सभागृह नेते पदी हणमंत जगदाळे

ठाणे पालिकेच्या सभागृह नेते पदी हणमंत जगदाळे

Published on

ठाणे पालिकेच्या सभागृह नेतेपदी हणमंत जगदाळे
विरोधी पक्षनेते पदी शानु पठाण
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर सोमवारी (ता. २३) ठाणे महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सभागृह नेते व विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडी जाहीर केल्या. पालिकेच्या सभागृह नेते पदी हणमंत जगदाळे तर, विरोधी पक्षनेते पदी शानु पठाण यांची निवड जाहीर करण्यात आली.
नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत एकूण १३१ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामध्ये शिंदे गटाचे ७५, भाजपचे २८, शरद पवार गटाचे १२, अजित पवार गटाचे ९, एमआयएमचे ५, ठाकरे गटाचा १ आणि १ अपक्ष सदस्य निवडून आला आहे. ३ फेब्रुवारी रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत शिंदे गटाच्या शर्मिला पिंपळोलकर यांची महापौरपदी, तर भाजपचे कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी निवड झाली होती. त्यानंतर आता पालिकेतील स्थायी समिती, शिक्षण मंडळ, परिवहन समिती, पाच विषय समित्या गठीत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. शुक्रवार (ता. २०) पालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सभा पूर्णवेळ तहकूब केली.
दरम्यान, सोमवारी खंडित महासभा घेण्यात आली. या सभेत शर्मिला पिंपळोलकर यांनी सभागृह नेता पदावर हणमंत जगदाळे यांची तर, विरोधी पक्ष नेतेपदी शानु पठाण यांची पदावर निवड केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com