पालिका सचिव रडारवर
परिवहन सदस्य निवडीचा प्रस्ताव असताना नवी मुंबई महापालिकेच्या सचिव संघरत्ना खिल्लारे या गैरहजर राहिल्याबद्दल शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी संताप व्यक्त केला. नगरसेविका सरोज पाटील यांनी विशेष सभेचा अजेंडा पोहोचला नाही. कोणतीही सूचना आलेली नाही. विश्वासात न घेता सचिवांकडून कारभार केला जात असल्याचा आरोप केला.
विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी सचिव नसल्याने आयुक्तांनी उपसचिवांची नेमणूक करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र सचिवांकडून यापूर्वीदेखील महापौर, उपमहापौर निवडीच्या प्रस्तावाबरोबर अन्य प्रस्ताव मनमानी पद्धतीने विषयपत्रिकेत मांडण्यात आले होते. त्यामुळे सचिवांच्या कारभाराबाबत शंका उपस्थित होत असल्याचे ते म्हणाले. सभागृह नेते सागर नाईक यांनी सचिव कार्यालय आयुक्तांच्या अधिकारात नाही. जर सचिवांचा मनमानी कारभार चालत असेल तर त्यांना पुढच्या वेळी सूचना द्याव्यात, असे सूचित केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

