बालवैज्ञानिकांचा सन्मान
बालवैज्ञानिकांचा सन्मान
‘शेतकऱ्यांसाठी समस्या समाधान’ प्रकल्पाला प्रथम क्रमांक
नेरूळ, ता. २३ (बातमीदार) : राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञान प्रदर्शनात ‘शेतकऱ्यांसाठी समस्या समाधान’ या प्रकल्पाला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल शिक्षण प्रसारक विद्यालय (माध्यमिक), नेरूळ येथील वैभवी सावळे व स्नेहा कांबळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सेवा सहयोग फाउंडेशन व टीआयएए ग्लोबल केंपॅबिलिटीज यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी कोपरी येथील नवी मुंबई विद्यालयात ही स्पर्धा पार पडली. मार्गदर्शक शिक्षक शेखर शांताराम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेल्या प्रकल्पाने शेतीतील समस्यांवर उपयुक्त उपाय सुचवले.
या यशाबद्दल एनआरबी एज्युकेशनल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष नामदेव भगत यांनी विद्यार्थिनी व शिक्षकांचे अभिनंदन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे कौतुक करत भविष्यातही अशाच नाविन्यपूर्ण प्रकल्पांची अपेक्षा व्यक्त केली. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड वाढीस लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

