कुत्रा चावल्याने मानसिक संतुलन बिघडल्याने ३० वर्षीय युवकाची आत्महत्या

कुत्रा चावल्याने मानसिक संतुलन बिघडल्याने ३० वर्षीय युवकाची आत्महत्या

Published on

मानसिक संतुलन बिघडल्याने
३० वर्षीय युवकाची आत्महत्या
कुत्रा चावल्यानंतर रेबीजच्या भीतीने संपवले जीवन

कल्याण, ता. २३ (वार्ताहर) : कल्याण पूर्वेतील तीसगाव नाका परिसरात कुत्रा चावल्यानंतर रेबीजची लक्षणे दिसू लागल्याच्या भीतीने ३० वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. २२) घडली आहे. तीसगाव नाक्यावरील सहजीवन सोसायटीमध्ये राहणारा आयश विश्वनाथ अमीन (३०) असे मृत युवकाचे नाव आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोळसेवाडी पोलिसांकडून करण्यात येत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अमीन याच्या पश्चात एक भाऊ आणि वृद्ध आईवडील असा परिवार आहे. काही दिवसांपूर्वी तीसगाव नाका परिसरात भटक्या कुत्र्याने अमीन याच्या पायाला चावा घेतला होता. त्यानंतर त्याने केवळ एकच इंजेक्शन घेतल्याचे सांगितले जाते. मागील चार दिवसांपासून त्याच्या हालचालींमध्ये असामान्य बदल जाणवत असल्याचे नातेवाइकांकडून सांगण्यात आले. दरम्यान, रविवारी (ता. २२) सायंकाळी घरात कोणी नसताना अमीन याने याबाबतची सुसाईड नोट लिहून गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

घडलेली घटना अत्यंत वेदनादायक असून, नागरिकांसाठी हा गंभीर इशारा असल्याचे सांगण्यात येत आहे. कुत्रा चावल्यानंतर रेबीजचा धोका टाळण्यासाठी पूर्ण लसीकरण वेळेत घेणे अत्यावश्यक आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, योग्य वेळी पूर्ण उपचार घेतल्यास रेबीज पूर्णपणे टाळता येऊ शकतो. तसेच कुत्रा चावल्यानंतर भीती, गैरसमज किंवा लक्षणांबाबत संभ्रम निर्माण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com